
फुलंब्री : तहसील कार्यालयात कर्मचारी उशिरा येण्याच्या तक्रारी वाढल्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गोपनीय दौरा करीत फुलंब्री तहसील कार्यालयाच्या पायरीवर खुर्ची टाकून हातात हजेरी मस्टर घेऊन स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये तहसील कार्यालयातील १६ पैकी तीन तर पंचायत समिती कार्यालयातील ४५ पैकी दहा कर्मचारी हजर होते.