
जळगाव : नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेला बसलेल्या २२,०९,३१८ उमेदवारांपैकी १२,३६,५३१ उमेदवार पात्र ठरले आहेत. म्हणजेच एकूण ५५. टक्के निकाल लागल्याची माहिती समोर आली आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील तेजश्री किशोर बिऱ्हाडे या विद्यार्थिनीने आर्थिक परिस्थितीवर मात करून आत्मविश्वासाच्या बळावर नीट परीक्षेत यश प्राप्त करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.