Temperature News : राज्यात तापमानात वाढ; पुण्यात पारा ३९ अंशांवर, तर मुंबईसह कोकणात उष्णतेचा 'येलो अलर्ट'!

Maharashtra Heatwave Alert : पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. उकाड्यात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाही होत आहे.
Maharashtra Heatwave Alert
Maharashtra Heatwave Alertesakal
Updated on

Maharashtra faces intense heatwave : पुणे शहरात दोन दिवसांपासून कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. मात्र रविवारी कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. उकाड्यात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाही होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) मुंबईसह कोकणात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाची ताप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com