राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 41 वर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

मराठवाड्यात काही भागांत तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे निदर्शनास आले. विदर्भात मंगळवारपर्यंत (ता. 1), तर मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत (ता. 29) उष्णतेची लाट राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

दरम्यान, मराठवाड्याच्या काही भागांत तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. राज्यात चंद्रपूरमध्ये 45.2 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात 40.4 अंश सेल्सिअस, तर लोहगावमध्ये 41.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात नगर (43.7), जळगाव (44.4), सोलापूर (42.4) येथे 41 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद आहे.

मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये 41.6 आणि परभणीमध्ये 44.3 कमाल तापमान होते. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होता. अकोला (45), अमरावती (44.4), बुलडाणा (42.5), चंद्रपूर (45.2), नागपूर (44.3), वर्धा (45) आणि यवतमाळ (44) अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि परिसरात कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Temperature rises in most parts of Maharashtra