राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल; प्रवेशप्रक्रियेला चांगला प्रतिसाद

राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल; प्रवेशप्रक्रियेला चांगला प्रतिसाद


मुंबई : आयटीआय प्रवेश प्रक्रियेला राज्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यामध्ये सात दिवसांमध्ये आयटीआय प्रवेशासाठी तब्बल 84 हजार 966 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अमरावती विभागातून सर्वाधिक तर त्याखालोखाल नाशिक व पुणे विभागातून नोंदणी झाली आहे. नोंदणीमध्ये मुंबई विभाग अखेरच्या क्रमांकावर आहे.

कौशल्याधारित विद्यार्थी घडावेत यासाठी सरकारकडून आयटीआय अभ्यासक्रमांवर अधिक भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील शासकीय आणि खाजगी 986 आयटीआय संस्थांमध्ये असलेल्या 1 लाख 45 हजार 828 जागांसाठी 1 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. या प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, 84 हजार 966 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केल्यानंतर 62 हजार 259 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. तर 45 हजार 39 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहेत.

तसेच 28 हजार 746 विद्यार्थ्यांनी विकल्प सादर केले आहेत. अर्ज पूर्ण भरणे, शुल्क भरणे, विकल्प सादर करण्यामध्ये अमरावती, नाशिक, पुणे या विभागातील विद्यार्थी आघाडीवर आहेत. सात दिवसांमध्ये अमरावती विभागातून सर्वाधिक 11 हजार 810 विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले. त्याखालोखाल नाशिकमधील 11 हजार 523 आणि पुणे 11 हजार 120 विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. त्याचप्रमाणे शुल्क भरल्यानंतर अमरावती विभागातून सर्वाधिक 5752 विद्यार्थ्यांनी विकल्प सादर केले आहेत. त्याखालोखाल नाशिक 5180, पुणे 5478 विद्यार्थ्यांनी विकल्प सादर केले आहेत.

रोजगारक्षम शिक्षणावर केंद्र सरकारसह राज्य सरकारचा भर असला तरी कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विभागातून सर्वाधिक कमी 6912 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. त्यातील फक्त 2912 विद्यार्थ्यांनी शुल्कासह विकल्प अर्ज भरले आहेत. 

विभागनिहाय प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी

  अर्ज पूर्ण भरले    शुल्क भरले      विकल्प भरले
अमरावती 11810  8475 5752
नाशिक 11523 8401 5180
पुणे 11120 8357 5478
औरंगाबाद 11111 7898 4883
नागपूर 9783 6983 4541
मुंबई 6912 4925 2912
एकूण 62259 45039 28746

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com