esakal | घातपाताच्या कटातील सर्व आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

Police Custody

घातपाताच्या कटातील सर्व आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी

sakal_logo
By
सुधीर काकडे

पोलिसांच्या विशेष विभागाने मंगळवारी दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळून लावत सहा जणांना अटक केली. या सर्व आरोपींना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज झिशान कमर आणि आमीर जावेद या दोघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर ओसामा सामी, जान महंमद शेख ऊर्फ समीर कलिया, मूळचंद ऊर्फ साजू ऊर्फ लाला, महंमद अबू बकर देखील आज सकाळी न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहीती दिल्ली पोलिसांनी दिली होती.

अटक केलेल्या 6 जणांपैकी ओसामा सामी (वय २२, रा.ओखला), झिशान कमर (वय २८, रा. अलाहाबाद) हे दोन दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन यावर्षीच भारतात आले होते. यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांचे विशेष पथक तयार केले होते. यातील एकाला महाराष्ट्रातून अटक केली. जान महंमद शेख ऊर्फ समीर कलिया (वय ४७) हा महाराष्ट्रातील आहे. उत्तर प्रदेशमधील मूळचंद ऊर्फ साजू ऊर्फ लाला (वय ४७, रायबरेली), महंमद अबू बकर (वय २३, बहराईच) व महंमद आमीर जावेद (वय ३१, लखनौ), अशी अन्य तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. जान महंमद शेख हा मुंबईतील सायन येथे राहणारा आहे.

हेही वाचा: दिल्ली पोलिसांची महाराष्ट्रात कारवाई; राज्याच्या गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद

loading image
go to top