Thackeray Brothers Dussehra Rally 2025
esakal
Speculation rises if Uddhav and Raj Thackeray will unite at Dussehra rally 2025, Sanjay Raut clarifies the stand : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमधील वाढता संवाद आणि भेटीगाठी यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते, तर उद्धव ठाकरे यांनी गणपती दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र दिसतील का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. याचवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.