
Hindi Bhasha Morcha: ५ जुलैला मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणारेत. निमित्त मराठी भाषेचं आणि हिंदी सक्तीकरणाच्या विरोधाचं असलं तरी इथे मुद्दा भाजपच्या भूमिकेचा आहे. कारण तोडा, फोडा आणि राज्य करा असं सूत्र २०१९ नंतर भाजपनं हाती घेतलेलं दिसतंय. म्हणजे विरोधकांकडून तसा आरोप केला जात आहे. आताही शिवसेना-राष्ट्रवादीत फूट पाडून, त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या भाजपनं ठाकरे बंधूंच्या युतीतही खोडा घालण्याचा डाव टाकलेला दिसतोय. त्यासाठी भाजपनं अन् फडणवीसांनी नवी रणनीती आखल्याचं बोललं जातंय.