Shivsena: पक्षासोबत किर्तीकरांच्या घरातही फूट; बापाच्या मतदारसंघाला लेक लावणार सुरुंग?

कालच रात्री गजानन किर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि आज सकाळी त्यांच्या ठाकरे गटातल्या मुलाने बैठकीला हजेरी लावली.
Amol Kirtikar
Amol KirtikarSakal
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांचाच मुलगा अमोल कीर्तीकर यांनी शिवसेनेच्या बैठकीला हजेरी लावत वडिलांच्याच विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट याचे संकेत देत आहे.

Amol Kirtikar
Shivsena: ठाकरे गटाची पडझड थांबेना! गजानन किर्तिकरांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीचे फोटो अमोल कीर्तीकर यांनी फेसबुकवर टाकले आहेत. यामुळे आगामी काळात वडील व मुलगा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची चर्चा आहे. रात्रीच गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज सकाळी सुभाष देसाई आणि उपनेते अमोल कीर्तीकर यांनी पक्ष बांधणीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिंदे गटाला रोखण्याविषयी चर्चा झाली.

Amol Kirtikar
Eknath Shinde : ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पही निसटला, तरीही मुख्यमंत्री म्हणतात...

या बैठकीविषयीची माहिती अमोल कीर्तिकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून दिली आहे. शिवसेनेच्या वाटचालीसंदर्भात देसाई यांनी मार्गदर्शन केले. येत्या महापालिका निवडणूकीत पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील सर्व प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला, असं अमोल कीर्तीकर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे. सोबत या बैठकीचे फोटोही शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com