
Thackeray Group MPs Address 'Operation Tiger' Speculations ; 'ऑपरेशन टायगर' द्वारे ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदार शिंदे गटात सामील होऊ शकतात, असं सांगितलं जातं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. अशात आता ठाकरे गटाच्या खासदारांनी थेट पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सांवत यांनी सर्व खासदारांच्यावतीने भूमिका स्पष्ट केली.