ठाणे स्मार्ट सिटीच्या डिजी ठाणे उपक्रमाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

शहरांच्या सुनियोजित विकासासाठी स्मार्ट सिटी मिशनची स्थापना करण्यात आली आहे. वर्तनामध्ये बदल आणि नागरिककेंद्री व्यवस्था हा स्मार्ट सिटी मिशन ऑफ इंडियाचा गाभा आहे.
- हरदीपसिंह पुरी, गृहनिर्माणमंत्री

ठाणे - ठाणे महापालिकेच्या ‘डिजी ठाणे’ उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. डिजिटल युगात नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ‘डिजी ठाणे’ची ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रकल्प’ म्हणून निवड करण्यात आली आहे. लाखो ठाणेकरांना महापालिकेबरोबर जोडणारा प्रकल्प म्हणून ‘डीजी ठाणे’चे सर्व स्तरांत कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

दिल्ली येथे 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्मार्ट सिटी-एम्पॉवरिंग इंडिया कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांना ‘डिजी ठाणे’साठी ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रकल्प’ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

रश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला...​

ठाणे स्मार्ट सिटी लि.ने उत्कृष्ट कामगिरी केली असून सरकार, स्थानिक व्यवसाय यांच्यात वाढलेली डिजिटल कनेक्‍टिव्हिटी आणि सहकार्य ही उद्दिष्टे साध्य केली आहेत. नागरिकांद्वारे सरकार ते नागरिक, व्यवसाय ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक सेवा देण्यात ‘डिजी ठाणे’चे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ठाणे महापालिकेच्या नव्या, वेगवेगळ्या योजनांबरोबरच ठाण्यातील सांस्कृतिक व सामाजिक घडामोडींची माहितीही तात्काळ उपलब्ध करून दिली जात आहे. याचबरोबर ठाण्यातील नामांकित दुकाने, हॉटेल आदींची डिस्काऊंट कुपन्सही या माध्यमातून दिली जातात. आरोग्याबद्दल सजग असलेल्या ठाणेकरांना आरोग्य उत्तम राखण्यातही ‘डिजी ठाणे’चे साह्य होत असून शैक्षणिक माहितीही याद्वारे उपलब्ध होत आहे.

आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले....

‘डिजी ठाणे’ने राबवलेले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम ठाणेकरांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. ठाण्यात कोणते उपक्रम राबवणे गरजेचे आहे हे ‘डिजी ठाणे’च्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ठाण्याचे नागरिक सुचवत असतात. ठाण्यातील शाळकरी मुले, युवक, नोकरदार ते सेवानिवृत्त कर्मचारी या सर्वांनाच उपयुक्त ठरतील असे उपक्रम डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून राबवले जातात.

अयोध्येतील मंदिर २०२४ पूर्वी पूर्ण होईल!

त्यामध्ये पक्षाघात व त्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती देणारी कार्यशाळा, योग प्रशिक्षण शिबीर, शाळकरी मुलांसाठी प्रश्‍नमंजुषा, रक्तदानासाठीचे उपक्रम, राम मारुती रोडवरील शॉपिंग फेस्टिवल, ठाणे युथ आयकॉन स्पर्धा, डिजी मित्र वेब सेमिनार मालिका, छायाचित्र स्पर्धा, क्रिकेट अंदाज स्पर्धा असे अनेक उपक्रम ‘डिजी ठाणे’द्वारे आयोजित करण्यात आले. सर्व उपक्रमांना ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळेच ठाणे स्मार्ट सिटीच्या ‘डिजी ठाणे’चा सन्मान राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Smart Citys Digi Thane initiative is proudly honored at the national level