कांद्याची आवक घटली! सोलापूर बाजार समितीत मंगळवारी ३८८ गाड्या कांदा; सरासरी दर १७०० तर सर्वाधिक दर ३४०० रुपयांपर्यंतच

कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारच्या लिलावासाठी ३८८ गाड्या कांदा आवक झाली होती. चांगल्या कांद्याला तीन हजार ४०० रूपयांचा तर सरासरी भाव सतराशे रुपयांपर्यंतच स्थिर राहिल्याचे पहायला मिळाले. अवघ्या आठ क्विंटललाच सर्वाधिक दर मिळाला.
कांद्याला शंभर रुपयांचा दर
कांद्याला शंभर रुपयांचा दरesakal

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारच्या लिलावासाठी ३८८ गाड्या कांदा आवक झाली होती. चांगल्या कांद्याला तीन हजार ४०० रूपयांचा तर सरासरी भाव सतराशे रुपयांपर्यंतच स्थिर राहिल्याचे पहायला मिळाले. अवघ्या आठ क्विंटललाच सर्वाधिक दर मिळाला.

राज्यातील नाशिक बाजार समितीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील दरवर्षी कांद्याची आवक जास्त असते. काही दिवसांपूर्वी वातावरणातील बदल, अवकाळीचा दणका आणि केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयानंतर सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली होती. दररोज अकराशे ते साडेतेराशे गाड्यांची आवक बाजार समितीत झाली.

६ डिसेंबरनंतर बाजार समितीचे नियोजन कोलमडले आणि आवक जास्त आल्याने एक दिवसाआड लिलाव सुरू झाला. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आणि कांद्याचे दर गडगडले. सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेतली आणि दररोज लिलाव करण्याचा निर्णय घेतला. पण, दररोज ६०० गाड्यांमधील कांद्याचाच लिलाव होईल, अशी अट घातली. आता कांद्याची आवक घटल्याने दररोज येणाऱ्या संपूर्ण कांद्याचा लिलाव होत असल्याची वस्तुस्थिती आहे. पण, अजूनही कांद्याचे दर वाढलेले नाहीत. सध्या प्रतिकिलो एक रूपया ते ३४ रूपयांपर्यंत भाव आहे, पण सर्वाधिक दर हा खूपच कमी कांद्याला मिळत आहे. यंदा कांद्याचे क्षेत्र व उत्पादन मागील पाच वर्षांच्या तुलनेत कमीच आहे.

आवक, उत्पादन कमी, तरीही दर गडगडलेलेच

सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात दोन हजार ९०६ हेक्टरवर, लेट खरीपमध्ये १४ हजार ७८ आणि रब्बीत सात हजार ८६० हेक्टरवर कांदा लावगड झाला आहे. पण, दुष्काळ, अवकाळी अशा संकटांमुळे त्यातील बऱ्याच कांद्याचे नुकसान झाले आहे. आता कांद्याची आवक घटत असतानाही दर मात्र वाढलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. भाव जास्त येईल म्हणून अनेकजण कांदा बंगळुरूच्या बाजारात नेत असल्याचीही उदाहरणे आहेत.

मंगळवारच्या लिलावानुसार...

  • एकूण कांदा आवक

  • ३८८ गाड्या

  • सरासरी भाव

  • १७०० रुपये

  • कांदा विक्री

  • ३८,८३५ क्विंटल

  • सर्वाधिक दर

  • ३४०० रुपये

  • कांदा विक्री

  • ८ क्विंटल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com