
सोलापूर : सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत पोचलेला कांद्याचा भाव आता चार-साडेचार हजारांपर्यंत खाली आला आहे. साडेतीन हजार रुपयांचा सरासरी भाव आता अठराशे रुपयांपर्यंतच आहे. मागील १५ दिवसांत सोलापूर बाजार समितीत आवक तेवढीच असताना देखील भावात प्रतिक्विंटल १७०० रुपयांची घसरण झाली आहे.