घरात नाग पाळणाऱ्या महाराष्ट्रातील गावाबद्दल माहिती आहे का?

महाराष्ट्रातील शेतपाळ गावात प्रत्येक घरात साप पाळले जातात.
Shetwal Village
Shetwal VillageSatara

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गावं आहेत. गावांचे सौंदर्य आणि त्यांचे वेगळेपण कधी कधी लोकांना थक्क करून टाकते. महाराष्ट्रात (Maharashtra) एक असं गाव आहे जिथे प्रत्येक घरात साप (Snakes) पाळले जातात. एवढेच नाही तर या गावातील मुले सापांसोबत खेळतात. वाचून धक्का बसला ना? पण हे खरंय.आश्‍चर्याची बाब म्हणजे या गावात आजपर्यंत एकाही व्यक्तीला साप चावला नाही. (The country's most unique village, snakes are reared in every house, children play together)

Shetwal Village
Video: रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमेरिकेत आंदोलन

महाराष्ट्रातील या गावाचे नाव शेतपाळ असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पुरातन काळापासून सापांची पूजा केली जाते. त्यामुळेच गावातील प्रत्येक घरात सापांना खूप महत्त्व आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाला सापांची खूप आवड आहे, त्यामुळे येथे साप पाळले जातात.

शेतपालमध्ये सध्या प्रत्येक घरात साप पाळण्यात आले आहेत. इतकंच नाही तर काही घरांमध्ये अतिविषारी नागही (Corbra) पाळले जातात आणि हे सर्व साप घरात उपस्थित असलेल्या मुलांसोबत खेळतानाही दिसतात. गावात पाळीव प्राण्यांप्रमाणे साप फिरत असतात. अनेक लोक मोठ्या कुतूहलाने या अनोख्या गावाला भेट देतात.

Shetwal Village
Video: युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रशियातच आंदोलन

गावात सुमारे २६०० ग्रामस्थ राहत असून आजपर्यंत कधीही गावकऱ्यांना साप चावलेला नाही आणि याआधीही या गावात कोणाला साप चावला नसल्याचे सांगितले जाते. यासोबतच घरात सापांना राहण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. ही जागा घराच्या छतावर बांधलेली आहे, याला देवस्थान म्हणतात. पूजेचा सण आला की गावातील लोक पूर्ण विधीपूर्वक नागांची पूजा करतात. गावात अनेक नाग मंदिरे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com