
Shivsena : सेना आणि धनुष्यबाण! आयोगाचा निर्णय आला अन् या शिंदे गटाच्या नेत्यांनी पटापट बदलले DP
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंना हा आयोगाचा मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर शिंदे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. या निर्णयानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांनी सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये 'धनुष्यबाण' चिन्ह लावल्याचं दिसून आलं आहे.
निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळताच शिंदेनी स्वत: ट्वीटरवरील प्रोफाईल फोटोबदलून धनुष्यबाण व शिवसेना हे नाव असलेला फोटो प्रोफाईला ठेवला. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या शिंदे गटातील नेत्यांनी देखील ट्विटरवरील प्रोफाईल फोटोमध्ये धनुष्यबाण चिन्हाचा समावेश केला आहे.
प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण चिन्ह लावलेले नेते :
1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2) उद्योगमंत्री उदय सामंत
3) उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
4) खासदार श्रीकांत शिंदे
5) शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
6) कृषीमंत्री अब्दुल सत्तार
7) आरोग्य मंत्री तानाजी सावंत
8) बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे
9) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
10) रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे
शिंदे गटातील जवळ-जवळ सर्व मंत्र्यांनी आणि नेत्यांनी त्यांचे ट्वीटर आणि फेसबुकवरील फोटोमध्ये धनुष्यबाण चिन्हाचा वापर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल याचा निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांना शिवसेना असे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे. यानंतर लगोलग शिंदे गटातल्या नेत्यांनी प्रोफाईल अपडेट करत धनुष्यबाण चिन्हाचे फोटो ठेवले आहेत.