गुजरातमधून सुरुय ड्रग्जचा खेळ; नवाब मलिकांचा मोठा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Nawab Malik

गुजरातमधून सुरुय ड्रग्जचा खेळ; नवाब मलिकांचा मोठा आरोप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत काही आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माझ्या मुलीने अब्रु कसानीची नोटीस पाठवली आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, गुजरातमधील द्वारकेत ड्रग्ज सापडले आहेत. ड्रग्जचा हा खेळ गुजरातमधूनच सुरु असल्याचा मोठा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीसांना पाठवली नोटीस

निलोफर यांचे पती आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हा आरोप केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी विधान केलं होतं की, माझ्या जावयाकडे ड्रग्ज सापडले होती. ते आठ-नऊ महिने हे बोलत राहिले. कालच मी सांगितलं होतं की माझी मुलगी त्यांच्याविरुद्ध नोटीस पाठवणार आहे. त्यानुसार तिने नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा: एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत संजय राऊतांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले...

गुजरात ड्रग्ज रॅकेटं माहेर?

पुढे ते म्हणाले की, द्वारकेमध्ये साडेतीनशे कोटींचे ड्रग्ज पकडले गेले. प्रश्न असा आहे की, हा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर चालत नाही ना? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. आम्ही एनसीबीला विनंती करतो की त्यांनी याबाबत तपास करावा. समुद्रमार्गे गुजरातमध्ये ड्रग्ज येतात आणि मग ते देशभर पसरतात का याचा तपास करावा. त्यांना अटक करुन कारवाई करा.

loading image
go to top