‘सरकारला विदर्भात यायचेच नाही; नागपूरमध्ये कुठलीच अडचण नाही’

आमदार निविसासाठी विलगीकरण कक्षात एकही रुग्ण तिसऱ्या लाटेत दाखल झालेला नाही
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleChandrashekhar Bawankule

नागपूर : महाविकास आघाडी सरकारला विदर्भातील जनता आणि विकासाबाबत काही देणे घेणे नाही. काही तरी क्षुल्लक कारण समोर करून अधिवेशन घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आमदार चंद्रशेख बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

दोन वर्षांपासून एकही अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात आले नाही. दोन महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची घोषणा केली होती. विदर्भातील आमदार आणि जनतेची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी वेळ मारून नेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Chandrashekhar Bawankule
Hinganghat Burning Case : दोषी विकेशला मरेपर्यंत जन्मठेप

कोरोनाची लाट ओसरली आहे. रुग्णांची संख्या फारशी नाही. त्यामुळे अधिवेशन घेण्यास नागपूरमध्ये (Nagpur) कुठलीच अडचण नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारला विदर्भात यायचे नसल्याने बहाणे सांगितले जात आहे. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी जागा नाही असे सांगण्यात आले. नागपूरमध्ये दोन हजार आसन क्षमता असलेले सुरेश भट सभागृह उपलब्ध आहे. येथे सहजपणे राज्यपालांचे अभिभाषण घेता येऊ शकते, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

आमदार निवसामध्ये विलगीकरणाची व्यवस्था केली असल्याचे म्हणने आहे. मात्र, शहरात दोनशेच्यावर रुग्णच नाही. आमदार निविसासाठी विलगीकरण कक्षात एकही रुग्ण तिसऱ्या लाटेत दाखल झालेला नाही. याशिवाय अधिवेशन असल्याने यापूर्वीच येथील विलगीकरण कक्ष हलवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. शहरात अनेक चांगले तारांकित हॉटेल्स आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांसाठी कॉटेजेस आहेत. त्यामुळे अधिवेशन नाकारण्यासाठी सरकारने दिलेले कारण तुटपुजे आहे, असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Hinganghat Burning Case : तब्बल दोन वर्षांनी मिळाला अंकिताला न्याय

हा वैदर्भीयांवर अन्याय

कोरोनाच्या संकटात पावसाळी अधिवेशन मुंबईत झाले. हिवाळी अधिवेशनही (Budget session) मुंबईतच झाले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेण्याचा महाविकास आघाडीचा घाट आहे. हा वैदर्भीयांवर अन्याय असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com