Sai Resort Demolition: किरीट सोमय्यांच्या आरोपामुळे गाजलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Resort Demolition

Sai Resort Demolition: किरीट सोमय्यांच्या आरोपामुळे गाजलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

दापोलीतील साई रिसॉर्ट तोडकामास दोन दिवसांपूर्वी स्थगिती देण्यात आली आहे. साई रिसॉर्ट प्रकरण न्यायप्रविष्ट त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याची ऑर्डर देण्यात आलेला नाही. सरकारी जमिनीवर अनिल परब आणि सदानंद कदम यांनी कब्जा केला आहे. या जमिनिवर आम्ही हातोडा मारला अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. दरम्यान या वर्षी तरी हे साई रिसॉर्ट पडणार नाही असे दिसून येत आहे.

दापोलीतील साई रिसॉर्ट संबधीची सुनावणी 9 जानेवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे 9 जानेवारीपर्यंत आता कोणतेही पाडकाम होणार नाही. जर कारवाईची नोटिस आली तर हायकोर्टात दाद मागता येणार आहे. याचिका कर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. सदा कदम यांची कारवाईच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सदानंद कदम यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.त्यावर सुनावणी घेताना हायकोर्टाने सुनावणी घेताना जास्त वेळ घालवला नाही. यासंबधी युक्तिवाद आज झाला नाही. हायकोर्टाने आपल्या व्यस्त कामकाजामुळे थेट 9 जानेवारी ही तारीख दिली आहे. तोपर्यंत हायकोर्टाने आधीचे आदेश ते कायम राहतील या कारवाईला स्थगिती दिली नसली तरी कदम यांना नोटिस बजावणे प्रशासनाला भाग आहे. या नोटीशीबद्दल कदम कोर्टात दाद मागू शकतात. आता सर्व प्रशासनावर अवलंबून आहे. ते घाईत कारवाई करतात की, सुनावणी होईपर्यंत थांबतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: Eknath Shinde: CM शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेवर केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण