Success Story : दोन मुलांची आई जिद्दीने बनली पोलीस; मनीषा कुटेंना पहिल्याच प्रयत्नात दोन पदांवर यश

Kute Family
Kute Family

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : दोन लहान मुले, संसार सांभाळत आणि पहिल्याच प्रयत्नात इथल्या मनीषा वैभव कुटे यांनी पोलीस भरतीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे एकाच नव्हे तर तब्बल पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक या दोन्ही पदांवर त्यांना यश मिळाले.

कौटुंबिक अडचणी, तक्रारींचा पाढा वाचत आहे त्याच समस्यांच्या गराड्यात स्वतःचे आयुष्य वाया घालणाऱ्या महिलांसाठी ही सणसणीत चपराक आहे. मनीषा यांच्या वाटचालीत खंबीर साथ देणाऱ्या पती वैभव, सासू कमल-सासरे संभाजी बाबुराव कुटे यांचेही विशेष कौतुक आहे.

Kute Family
Cabinet Meeting Decision : "एक रुपयात पीक विमा ते ९५ हजार कोटींची गुंतवणूक" मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय!

मनीषा यांचा विवाह त्यांच्या बारावीनंतर २०१६ ला झाला. आटपाडी तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेले शिंगुर्णी (ता. माळशिरस हे त्यांचे अगदी छोटेसे गाव. आई-वडील शेतकरी. लग्नानंतर घरी बसून न राहता इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पदवीधर झाल्या. दरम्यानच्या काळात सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडणे आलेच.

यातच त्यांना दोन मुले झाली. खरेतर आधीपासूनच वेगळे काहीतरी करून दाखवण्यासाठीची जिद्द मनात होती. त्यासाठी पोलीस होण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. गल्लीतच असणारी निकिता नावाची एक मैत्रीण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. तिच्या सल्ल्याने सामाजिक कार्यकर्ते रवी बावडेकर यांच्या हर्ष अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला.

Kute Family
Ncp Sharad Pawar Mumbai : सुमारे ५० हजार पुस्तिका काढणार ; राज्य सरकारच्या विरोधात निकाल वाचनाची राष्ट्रवादीची मोहीम..!

पती वैभव हे प्लबिंगचे काम करतात. सासू सासरे शेतकरी आहेत. आज त्यांना रुद्र (वय ७) आणि साई (६) ही दोन मुले आहेत. मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातला स्वयंपाक व अन्य जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी अभ्यास सुरू केला. पहाटे चारला उठून रात्री ९ वाजेपर्यंतचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले. आज झोपण्यापूर्वी उद्याचे वेळापत्रक तयार असायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याची तंतोतंत अंमलबजावणी असायची, असे त्या सांगतात.

वर्षभरापूर्वी जेव्हा पोलीस भरतीच्या अभ्यासाच्या मैदानात उतरल्या तेव्हा गणित विषयाची विषयाची प्रचंड भीती होती. मात्र ही भीती गाडून आज त्याच विषयात त्या 'टोपर' बनल्या असल्याचे त्यांचे शिक्षक श्री. बावडेकर सांगतात. पाढे पाठांतरपासून सुरुवात केली आणि हा विषय नंतर आवडीचा कधी बनला, हे समजलेच नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. क्लासमध्ये सहकारी मुलींमध्ये असलेले स्पर्धेचे वातावरण, शिक्षकांकडून करून घेतली जाणारी तयारी आणि ग्राउंडवर सराव करून घेणारे नावडकर सरांचेच हे श्रेय असल्याची प्रांजळ कबुली मनीषा देतात.

घरात दोन लहान मुले आहेत. त्यांना नेहमी "आई कुठे गेलीय?" अशी विचारणा व्हायची. त्यावर ही मुले "माझी मम्मी पोलीस बनून येणार आहे, ती पोलीस व्हायला गेलीय" असे सर्वांना सांगायची. आज या यशानंतर यापेक्षा आनंदाचे काही नाही, असे सासू-सासरे सांगतात. मनीषा यांनी चालक आणि कॉन्स्टेबल पदांसाठी दोन वेगवेगळ्या परीक्षा दिल्या आणि एकाचवेळी दोन्ही परीक्षांमध्ये यशस्वी ठरल्या.

लहान मुले आहेत, घरची जबाबदारी आहे म्हणून मी अडकून पडले नाही. घरातून पती, सासू सासरे यांचा विश्वास संपादन केला. कुटुंबीय स्वतः अभ्यासाची प्रगती जाणून घेण्यासाठी अकॅडमित यायचे, त्यामुळे तर जबाबदारीची जाणीव होती. चूल आणि मूल यापलीकडे जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रत्येक स्त्रीत क्षमता असते, ती वापरात आणली पाहिजे."

- मनीषा कुटे, इस्लामपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com