महापालिकेचा याच आठवड्यात वाजणार बिगुल! भावी नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागात आरोग्य शिबिरे, महासेवा शिबिरांसह ‘होम मिनिस्टर’चे डिजिटल फलक, वाचा...

महापालिका निवडणुकीचा बिगुल या आठवड्यात वाजणार आहे. आठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या विशेषत: सत्ताधारी भाजपकडून सर्वाधिक इच्छुक आहेत. पक्षाने आपल्यालाच उमेदवारी द्यावी, यासाठी इच्छुक प्रभागातील मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विविध फंडे अवलंबत आहेत. आरोग्य शिबिरे, महासेवा शिबिरे आयोजित करून त्याचे डिजिटल शहरातील चौकाचौकांमध्ये लावले जात आहेत.
Municipal corporation Election

Municipal corporation Election

esakal
Updated on

सोलापूर : महापालिका निवडणुकीचा बिगुल या आठवड्यात वाजणार आहे. आठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या विशेषत: सत्ताधारी भाजपकडून सर्वाधिक इच्छुक आहेत. पक्षाने आपल्यालाच उमेदवारी द्यावी, यासाठी इच्छुक प्रभागातील मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विविध फंडे अवलंबत आहेत. आरोग्य शिबिरे, महासेवा शिबिरे आयोजित करून त्याचे डिजिटल शहरातील चौकाचौकांमध्ये लावले जात आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील २६ प्रभागातील १०२ जागांसाठी भाजपकडून एक हजार आठ जण इच्छुक आहेत. काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी देखील निवडणुकीस इच्छुकांचे अर्ज घेतले आहेत. १०२ जागांसाठी इच्छुकांची संख्या दुप्पट, चौपट असली तरीदेखील त्यातून १०२ जणांनाच उमेदवारी मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर इच्छुक त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील आमदारांचे फोटो लावून विविध शिबिरांचे आयोजन करीत आहेत. त्या फलकांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांचे फोटो दिसत आहेत. दरम्यान, त्या फलकांवरील सत्ताधारी बड्या नेत्यांचे व स्थानिक आमदारांचे फोटो असल्याने त्या डिजिटलसाठी महापालिकेची परवानगी घेतली की नाही, याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

असे आहेत फलक...

  • १) मोफत महाआरोग्य शिबिर : प्रभाग क्रमांक सातमध्ये माजी महापौर पद्माकर काळे यांनी रविवारी (ता. १४) मोफत महाआरोग्य शिबिर घेतले. त्याचा डिजिटल काळी मशिदीजवळ महापालिकेच्या विभागीय कार्यालयालगत लावलेला होता. त्यावर बालरोग, त्वचारोग, दमा, पोटाचे विकार, हस्तीरोग, मेंदुचे विकार, पक्षाघात, संधिवात, ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, स्त्रीरोग व प्रसुतीपूर्व व प्रुसतीपश्चात तपासणीचे हे आरोग्य शिबिर असल्याचे म्हटले आहे.

  • २) मोफत महासेवा शिबिर : पॅनकार्ड, आधारकार्ड अपडेट, रेशनकार्ड दुरुस्ती, लाडक्या बहिणींची ई-केवायसी, बांधकाम कामगार नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड व आर्थिक योजनांचा लाभ, ई-श्रमकार्ड, आभा कार्ड, उज्वला गॅस योजना, नवीन मतदान नोंदणी व दुरुस्तीचे शिबिर प्रभाग सातमध्ये सुरज बंडगर यांनी घेतले. त्याचा फलक अवंती नगर परिसरात लावलेला होता.

  • ३) भव्य होम मिनिस्टर : प्रभाग सातमध्ये ज्ञानेश्वर सपाटे यांनी १३ डिसेंबरला ही स्पर्धा घेतली. यात विजेत्या १०० महिलांना ७०० रुपये किंमतीच्या साड्या भेट देण्यात आल्या. प्रथम विजेत्या महिलेस पाच हजारांची पैठणी व अन्य विजेत्यांनाही साड्या देण्यात आल्या.

  • ४) मोफत महासेवा शिबिर : प्रभाग १४ मध्ये १४ ते १६ डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविले जाईल, असा फलक लता चौगुले, अनुपमा चौगुले यांच्या नावासह पोटफाडी चौकात लावलेला आहे. त्यातून प्रधानमंत्री स्वनिधी योजना, पॅनकार्ड नोंदणी, लाडकी बहिणींची ई-केवायसी, आयुष्यमान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, ई-श्रम कार्ड योजना, बांधकाम कामगार नोंदणी, उज्वला गॅस योजनेत नवीन लाभार्थी नोंदणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com