शिक्षक भरतीसाठी नववर्ष उजाडणार! १८ जिल्ह्यांचीच बिंदुनामावली अंतिम; सोलापूर, पुण्यासह १० जिल्हे पिछाडीवर

सोलापूरसह पुणे, सांगली, सातारा अशा दहा जिल्ह्यांच्या बिंदुनामावलीत मागासवर्गीय कक्षाने त्रुटी काढल्या असून त्याच्या पूर्ततेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. या विलंबामुळे शिक्षक भरती पूर्ण होण्यासाठी २०२४ उजाडणार हे निश्चित झाले आहे.
schools
schoolssakal

सोलापूर : सात वर्षानंतर सुरु झालेली जिल्हा परिषद शाळांवरील २३ हजार पदांच्या शिक्षक भरतीची प्रक्रिया बिंदुनामावलीत अडकली आहे. सोलापूरसह पुणे, सांगली, सातारा अशा दहा जिल्ह्यांच्या बिंदुनामावलीत मागासवर्गीय कक्षाने त्रुटी काढल्या असून त्याच्या पूर्ततेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. या विलंबामुळे शिक्षक भरती पूर्ण होण्यासाठी २०२४ उजाडणार हे निश्चित झाले आहे.

ग्रामविकास विभागाच्या जून २०२३मधील निर्णयानुसार आता नवीन शिक्षक भरतीत उतरलेल्या उमेदवारांना स्वयंघोषणापत्र बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये त्याची निवड झाली आहे, त्यास निवृत्त होईपर्यंत तेथेच काम करावे लागणार आहे. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षक नियुक्तीसाठी पवित्र पोर्टवरूच एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जाणार आहेत.

तत्पूर्वी, शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील टप्पे पार करताना १८ जिल्ह्यांचीच बिंदुनामावली अंतिम झाली आहे. अजूनही १० जिल्ह्यांची बिंदुनामावली त्रुटीत अडकली असून त्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. त्यानंतर १५ ते २० दिवसांची मुदत देऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम निवडावे लागणार आहेत. डिसेंबर-जानेवारीत मेरिट यादी प्रसिद्ध होईल आणि पुढच्या वर्षी शाळा सुरु होतानाच हे नवीन शिक्षक संबंधित शाळांमध्ये रूजू होतील, अशी सद्य:स्थिती आहे.

दरम्यान, कंत्राटी भरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून शासकीय भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून निवडलेला तो पर्याय असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

‘या’ झेडपींच्या बिंदुनामावलीत त्रुटी

बिंदुनामावली निश्चित करून अंतिम मान्यतेसाठी मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रस्ताव द्यायला काही जिल्हा परिषदांना विलंब झाला. आता पुन्हा त्यात त्रुटी आढळल्याने त्याची पूर्तता करायला वेळ लागत आहे. अद्याप सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, ठाणे, जालना, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव या १० जिल्ह्यांची बिंदुनामावली अजूनही अंतिम झालेली नाही. सर्व जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षण विभागा बिंदुनामावली अंतिम झाल्यावरच शिक्षक भरतीला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे.

शिक्षक भरतीचे टप्पे...

  • १) उमेदवारांची नोंदणी झाली असून आता झेडपीकडून रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील.

  • २) उमेदवारांना जिल्हा व शाळांचा प्राधान्यक्रम निवडावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही मर्यादा नसणार आहे.

  • ३) उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून मेरिट यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानुसार संबंधितांना नियुक्ती दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com