लॉकडाउनचा पुढील टप्पा 15 जूनपर्यंत? मृत्यूदराने वाढविली चिंता

लॉकडाउनचा पुढील टप्पा 15 जूनपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव तयार
Lockdown
LockdownEsakal

सोलापूर : राज्यातील रुग्णसंख्या आटोक्‍यात येऊ लागली असून लॉकडाउनपूर्वी (Lockdown) राज्यातील दररोज सरासरी 66 हजार रुग्ण आढळत होते. आता ही संख्या 26 ते 28 हजारांवर आली आहे. मात्र, राज्याचा मृत्यूदर (लॉकडाउनपूर्वी 1.52 तर सध्या 1.54 टक्‍के मृत्यूदर) चिंताजनक (Mortality is alarming) असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे (Disaster Management Department) म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती पाहून 8 अथवा 15 जूनपर्यंत कडक लॉकडाउन वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. (The next phase of the lockdown is proposed to be extended to June fifteen)

Lockdown
ड्राफ्ट्‌समन व सुपरवायझर पदांसाठी 20 जूनला होणारी परीक्षा रद्द !

राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी दररोज सरासरी 66 ते 68 हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. दुसरीकडे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत होती. मात्र, लॉकडाउन जाहीर केल्यानंतर 23 एप्रिल ते 19 मे या काळात राज्यातील तब्बल 67 लाख 768 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात विशेषत: सुपर स्प्रेडरचा समावेश सर्वाधिक राहिला. टेस्टिंग वाढविल्याने 13 लाख पाच हजार 861 रुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले. मात्र, आजार अंगावर काढण्याबरोबरच विविध कारणांनी या काळात 21 हजार 119 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कडक निर्बंधामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आणि मोकाट फिरणाऱ्यांनाही चाप बसला. या पार्श्‍वभूमीवर रुग्णसंख्या कमी करण्यात यश मिळाले असून आता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. तरीही, रुग्ण कमी-कमी होतील, याची सध्या पूर्णपणे शाश्‍वती नाही. त्यामुळे आणखी काही दिवस लॉकडाउन वाढविल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही अंदाज येईल आणि दुसरी लाटही थोपविण्यात बरेच यश मिळेल, ही बाब त्या प्रस्तावात नमूद करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Lockdown
...अन्यथा औषधांची दुकाने बंद करावी लागतील !

मुख्यमंत्री मेअखेर निर्णय जाहीर करतील

राज्यातील रुग्णसंख्या आता आटोक्‍यात येऊ लागली असून ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. परंतु, मृत्यूदर वाढल्याने आणि अजूनही अपेक्षित रुग्णसंख्या कमी न झाल्याने लॉकडाउन आणखी काही दिवस वाढविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्री मेअखेर निर्णय जाहीर करतील.

- श्रीरंग घोलप, संचालक, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई

मुंबईतील व्यवहारावरील उठणार निर्बंध

राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, बीड, नागपूरसह चंद्रपूर, रत्नागिरी, सांगली, अमरावती या जिल्ह्यातील मृतांची संख्या अजूनही लक्षणीय आहे. तर शहरांच्या तुलनेत सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातच रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबई, पुण्यासह बहुतेक शहरातील रुग्णसंख्या आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईसह अन्य काही शहरातील व्यवहारावरील निर्बंध काही तासांसाठी शिथिल होऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com