आता तरी खोके सरकारने...; कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Aditya Thackeray and Bhagatsinh  Koshyari

आता तरी खोके सरकारने...; कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राज्यात गरारोळ सुरू आहे. विविध संघटनांकडून राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Amol Palekar : अमोल पालेकर सपत्नीक भारत जोडो यात्रेत समील; राहुल गांधींनी मानले आभार

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागायला हवी. तसेच केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी राज्यपालांना पदमुक्त करायला हवं. शिवाय खोके सरकारने मंत्रीमंडळात ठराव संमत करून त्यांना माफी मागायला भाग पाडायला पाहिजे, असंही आदित्य यांनी म्हटलं.

मागील तीन महिन्यात अनेक प्रोजेक्ट आपल्या हातून निघून गेले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मात्र अशा समस्या असताना राज्यपालांनी असं वादग्रस्त वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. आजपर्यंत पी.सी. अलेक्झेंडर यांच्यापासून अनेक राज्यपाल पाहिले, पण कधीही एवढे राजकीय राज्यपाल पाहिले नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: कोश्यारींच्या विधानावरून वाद पेटला! आंदोलक अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपच्या मनात महाराष्ट्राविषयी किती राग आहे हे दिसून येत.