कोरोनानंतर वाढला मधुमेहाचा धोका! चार लक्षणांवर ठेवा लक्ष अन्‌ ‘हे’ उपाय करा, टळेल आजार

मधुमेह हा एक आजार असून त्याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम हळूहळू शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. हा रोग पुढे गंभीर गुंतागुंतीकडे जातो आणि त्यातून हृदयविकाराचा धोका, मूत्रपिंडाचे नुकसान आणि दृष्टी समस्या वाढू शकतात.
साखरेची योग्य प्रमाणात सेवन करा
साखरेची योग्य प्रमाणात सेवन कराsakal

सोलापूर : मधुमेह हा एक आजार असून त्याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम हळूहळू शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. हा रोग पुढे गंभीर गुंतागुंतीकडे जातो आणि त्यातून हृदयविकाराचा धोका, मूत्रपिंडाचे नुकसान आणि दृष्टी समस्या वाढू शकतात. हाता-पायाला मुंग्या येतात, घाम येतो. रक्तवाहिनीचे (बीपी) विकार देखील होऊ शकतात. काही लक्षणे अशी आहेत, ती अजिबात दिसत नाहीत. पण, काही लक्षणे त्या रोगाला सहज पकडण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाचा आजार समजून घेण्यासाठी पहिल्यांदा लक्षणे ओळखता यायला हवीत.

प्रत्येक माणसाला मधुमेहाशी संबंधित लक्षणांशी परिचित असणे महत्वाचे आहे. सध्या या आजाराचे लोक खूपच वाढले आहेत. शरीरात होणारे विशेष व छोटे बदल ओळखता येणे काळाची गरज आहे. आपण मधुमेहाची लक्षणे वेळेआधी सहज ओळखू शकता आणि भविष्यात हा आजार टाळू शकता. प्री-डायबिटीज झाल्यानंतरही शरीरात साखर वाढण्याची लक्षणे दिसू लागतात. मधुमेह होण्याआधी, सकाळी शरीरात ५ लक्षणे दिसतात. लक्षणे ओळखून रक्तातील साखरेची वाढ सहज समजू शकते. मधुमेहापूर्वीची लक्षणे नेमकी कोणती, ते जाणून घेऊया. लक्षणे समजल्यास निश्चितपणे हा आजार वेळेत रोखता येऊ शकतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम व ध्यानधारणा करावी. मानसिक तणाव नसल्यास शुगर वाढणार नाही.

रात्री वारंवार मुत्रवित्सर्जन

शुगर वाढू लागल्याने किडनीची प्राकृत आवस्था बदलते. किडनीच्या कार्यात फरक पडतो आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी वारंवार मुत्रवित्सर्जन होते. युरिन सिक्रीशन वाढतात. त्यामुळे किडनीचा आजार होऊ शकतो.

थकवा जाणवतो

रक्तात पांढरी व लालपेशी असतात. जखम तथा इन्फेक्शन झाल्यास डिफेन्स मेकॅनझिम म्हणून पांढरी पेशी रोगाविरूद्ध लढतात. शुगर जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि थकवा जास्त जाणवतो. रुग्णाला झालेली जखम लवकर बरी होत नाही.

वारंवार भूक लागते

जेवण केल्यावर ते ग्लुकोजमध्ये रुपांतरीत होते. त्यामुळे एनर्जी मिळते. साखरेची मात्रा इन्सुलिनमुळे नियंत्रित होत असते. पण, शुगरमुळे तसे न झाल्याने सतत भूक लागते. तसेच पॅनक्रियाजमधून इन्सुलिन सिक्रीशन कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे शुगर झालेल्या रुग्णांना इन्सुलिन दिले जाते. जास्तवेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्याने आणि शारीरिक श्रम नसल्यास शुगर वाढीचा धोका जास्त असतो.

वारंवार तहान लागते

सकाळी उठल्यानंतर कोरडे तोंड किंवा खूप तहान लागल्यास, ही मधुमेहाची चिंताजनक चिन्हे असू शकतात. शरीरात ही लक्षणे सतत दिसल्यास ताबडतोब तपासणी करा. वारंवावर मुत्रवित्सर्जनामुळे तहान लागते. चरबी वाढलेल्या जाड व्यक्तींना घाम येतो. शुगर जाते. नॉर्मल रुग्णांमध्ये शुगर नसते, पण मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढलेली शुगर युरिनद्वारे जाते. सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने मधुमेहाचे आणखी एक लक्षण म्हणजे मळमळ. अधूनमधून मळमळ होत असली तर त्याचे नुकसान होत नाही, परंतु वारंवार मळमळ होणे मधुमेहासाठी धोकादायक लक्षण असू शकते.

नक्की आत्मसात करा ‘हे’ उपाय

  • लक्षणे असलेल्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन साखरेची तपासणी करून घ्यावी

  • लाईफ स्टाईल बदलावी, मानसिक ताणतणाव नको, व्यायाम (फास्ट चालणे, सायकलिंग) हवा.

  • एकाच ठिकाणी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ बसू नये.

  • नवान्नाचे सेवन करू नये, स्टार्चचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खावू नयेत. जुने तांदुळ खावेत. शाबूदाणा खावू नये.

  • वेळेवर जेवण करावे आणि पुरेशी झोप हवी. आहारात फळ व पालेभाज्या असाव्यात.

लाईफ स्टाईल बदलावी लागेल

शुगर झालेल्या रुग्णांनी वेळोवेळी सर्व तपासण्या (किडनी, डोळे, ह्दय अशा) करून घ्याव्यात. नियमित साखर तपासणी करावी, लाईफ स्टाईल बदलावी. अनुवंशिक शुगर असलेल्यांनी व्यायाम नियमित करावा. एका ठिकाणी खूप वेळ बसून राहणे, व्यायाम नाही, वारंवार जेवण (ग्लुकोज व स्टार्च अधिक असलेले पदार्थ टाळावेत) केल्यास मधुमेहाचा धोका होऊ असतो.

- डॉ. विना जावळे, प्राचार्य, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com