esakal | कुठेही वाढवल्या नसतील एवढ्या आरोग्यसुविधा राज्याने वाढवल्या : मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

कुठेही वाढवल्या नसतील एवढ्या आरोग्यसुविधा राज्याने वाढवल्या : मुख्यमंत्री

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधीमंडळात आमदारांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. "राज्याचा अर्थसंकल्प - माझ्या मतदार संघाच्या संदर्भात" कार्यशाळा उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. दोन दिवसाची ही कार्यशाळा आहे. अर्थसंकल्प हा ठिपक्यांच्या रांगोळीसारखा आहे. ठिपके जोडले तर राज्य जोडलं जातं आणि विकास होतो, असं म्हणत आमदारांच्या या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केलंय.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, काल शाळेची घंटा वाजली आणि आज आपलाच वर्ग भरला आहे. या कार्यशाळेत अर्थसंकल्प कसा तयार केला जातो, यावर मार्गदर्शन होतंय. मात्र, आजची बैठकीच्या नंतर सुद्धा प्रत्येक विषयावर बैठका झाल्या पाहिजेत. अर्थसंकल्प मांडताना शेरोशायरी, कविता, संतवचन येतात. अर्थसंकल्प मांडणं हे कौशल्य आहे. तो समजून घेऊन मांडणं हे त्याहून कठीण काम आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला हत्याकांडासारखा : शरद पवार

हेही वाचा: 4,084 कोटी रुपये थकवले; केंद्राने करून दिली योगींना आठवण

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील लोक आपल्याला इथे पाठवतात. ते आपल्या उमेदवाराकडे अधिवेशनात लक्ष देऊन पाहत असतात. हा काही कुस्तीचा आखाडा नाहीये, कि प्रत्येक गोष्टीवर भांडायलाच हवं.

कोरोना आपत्तीत जगाची दाणादाण उडाली मात्र तरीही ठामपणे सांगतो जगात कुठेही नसेल इतकी आरोग्याची सुविधा महाराष्ट्राने वाढवली आहे. गेल्या वर्षात विकासमकामांचा पैसा आरोग्याच्या सुविधांसाठी प्राधान्याने द्यावा लागला आहे. तरीही संकटांची मालिका काही थांबलेली नाहीये. एकामागून एक संकटांची मालिका सुरु आहे. अनेक वादळे येतात, नुकसान होतं. त्यांचं तातडीने पुनर्वसन आणि मदत करावी लागते. आजपर्यंत एखादं दुसरं वादळ यायचं पण आता सपाटाच लागलाय एकामागाहून एक आपत्ती येत आहेत. त्या सावरुन आपण पुढे जातोय, असंही ते म्हणाले.

loading image
go to top