
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! 2013 पासूनच्या 'TET'ची होणार पडताळणी
सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षेतील (Teacher Eligibility Test) गैरव्यवहारानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाने (Department of Primary Education) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 6 जानेवारीला दुपारी दोन वाजेपर्यंत 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना व इतर उमेदवारांना त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे. (The TET certificate of teachers appointed after 2013 will be verified)
हेही वाचा: महाविकास आघाडीचे 'असे' असेल जागावाटप! भाजपला रोखण्यासाठी तयारी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे (Maharashtra State Examination Council, Pune) आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षेतील गैरव्यहार प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांनी नियुक्ती, पदस्थापना मिळविली, असा शालेय शिक्षण विभागाला संशय आहे. त्यामुळेच 4 जानेवारी रोजी त्यासंबंधीचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षकपदी नियुक्त झालेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी व खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यासंबंधीचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत ते प्रमाणपत्र संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद अथवा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ते प्रमाणपत्र जमा करायचे आहे. प्रत्येकांनी त्यांच्याकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
टाळाटाळ केल्यास कारवाईची शक्यता
शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) खासगी प्राथमिक शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये (ZP School) शिक्षकपदी नियुक्त झालेल्यांना त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र संबंधितांकडे जमा करावे लागणार आहे. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत जे शिक्षक प्रमाणपत्र देणार नाहीत, त्यांच्या बाबतीतील अहवाल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. तो अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाला पाठविला जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.
हेही वाचा: Covid 19 : तिसरी लाट रोखण्यासाठी 12 हजार कोटींचा निधी!
आदेशातील ठळक बाबी...
13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेले व नियुक्ती दिलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार पडताळणी
संबंधितांनी 'टीईटी'चे (शिक्षक पात्रता परीक्षा) मूळ प्रमाणपत्र तत्काळ शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश
सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी (खासगी प्राथमिक शाळा) त्यांच्या कार्यक्षेत्रातील नियुक्त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी
वैयक्तिक मान्यता, पदस्थापना दिलेल्या शिक्षकांचे टीईटी मूळ प्रमाणपत्र 6 जानेवारीनंतर कार्यालयात सादर करावे
6 जानेवारी रोजी दुपारी दोनपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे; टाळाटाळ करणाऱ्यांचा अहवाल शिक्षण विभागाला होणार सादर
Web Title: The Tet Certificate Of Teachers Appointed After 2013 Will Be Verified
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..