esakal | अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी आजपासून
sakal

बोलून बातमी शोधा

11 th addmission

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी आजपासून

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत तिसरी नियमित फेरी जाहीर करण्यात आली असून ती ७ ते १६ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत अंतिम गुणवत्ता यादी सोमवारी (ता. १३) जाहीर होणार आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा: कर्जाला कंटाळून मुलीचा खून ; आई-वडिलांची आत्महत्या

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रवेशाची तिसरी नियमित फेरी आणि कोट्यातंर्गत प्रवेशाची प्रक्रिया जाहीर केली आहे. या फेरीतंर्गत यापूर्वी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जातील दुसऱ्या भाग अपडेट करण्याची सुविधा मंगळवारपासून (ता. ७) उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नव्याने अर्ज करणे आणि सबमिट करणे, नवीन अर्ज नोंदणी करून अर्जाचा भाग एक व्हेरिफाय करणे, अर्ज सबमिट करणे आणि लॉक करणे, तसेच अर्जातील भाग दोन भरून अर्ज दुसऱ्या फेरीसाठी लॉक करणे, यासाठी गुरुवार (ता.९) मुदत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

प्रवेश प्रक्रियेचा तपशील : कालावधी

-नवीन अर्ज नोंदणी, दुसऱ्या फेरीत प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भाग अपडेट करण्यासाठी मुदत, अर्जाच्या पहिल्या भागात बदल करण्याची सुविधा, अर्ज लॉक करणे आणि व्हेरीफाय करणे, आतापर्यंत प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करणे (भाग एक आणि दोन भरणे), अर्जाचा भाग दोन भरून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज लॉक करणे : ७ ते ९ सप्टेंबर (रात्री आठ वाजेपर्यंत)

-दुसऱ्या नियमित फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : १३ सप्टेंबर (सकाळी दहा वाजता)

-विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट होणे, महाविद्यालयांना प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे दिसणे, दुसऱ्या फेरीतील कट ऑफ यादी जाहीर होणे, विद्यार्थ्यांना प्रवेशाचा एसएमएस जाणे : १३ सप्टेंबर

-महाविद्यालये अॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’वर क्लिक करणे, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेश निश्चित करणे : १३ ते १५ सप्टेंबर (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)

- कनिष्ठ महाविद्यालयांनी दुसऱ्या फेरीतील प्रवेश झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे : १५ सप्टेंबर

- रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १६ सप्टेंबर (रात्री दहा वाजता)

कोट्यांतर्गत प्रवेशाचा तपशील : कालावधी

-व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातंर्गत अर्ज सबमिट करणे, कोट्यांतर्गत प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अर्ज करणे : ७ ते ९ सप्टेंबर

- कोट्यांतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर करणे : १३ सप्टेंबर

- कोट्यांतर्गत प्रवेश निश्चित करणे, व्यवस्थापन कोट्यांतर्गत रिक्त जागा कॅप फेरीसाठी समर्पित करणे :१३ ते १५ सप्टेंबर

- संबंधित संकेतस्थळावर कोट्यांतर्गत झालेल्या प्रवेशाचा तपशील अपलोड करणे : १५ सप्टेंबर

- कोट्यातंर्गत रिक्त जागांचा तपशील दर्शविणे : १६ सप्टेंबर

-प्रवेशासाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in

loading image
go to top