तिसरी लाट सौम्य नसेल, निष्काळजी राहू नका; जिल्हाधिकाऱ्यांना इशाऱ्याचं पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Restrictions

'निष्काळजी राहू नका'; आरोग्य सचिवांचं जिल्हाधिकाऱ्यांना इशाऱ्याचं पत्र

मुंबई: जानेवारी तिसऱ्या आठवड्यात 2 लाख केसेस असतील, असा अंदाज आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे. यासंदर्भातील एक सविस्तर पत्र आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, आताचा रुग्ण वाढीचा वेग बघता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात दोन लाख रुग्ण होऊ शकतात. या तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढणार आहेत, तशी शक्यता दिसून येत असल्याचं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: नवीन वर्षाच्या मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा; अजित पवार म्हणतात, 'हे वर्ष...'

या पत्रात प्रदीप व्यास यांनी म्हटलंय की, राज्यातील कोविड पॉझिटिव्ह प्रकरणांची वाढती संख्या आपणा सर्वांना माहीत आहे. ज्याप्रकारे नवीन प्रकरणे वाढत आहेत, ती पाहता जानेवारी २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याकडे सुमारे २ लाख सक्रिय कोविड प्रकरणे असतील अशी अपेक्षा आहे. यापैकी काहींना हॉस्पिटलायझेशनची गरज भासल्यास या संख्येचं नियोजन करण्याची आज स्वतंत्र सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की सोशल मीडिया/प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे तुम्ही असं समजून नका की ओमिक्रॉन हा सौम्य आजार आहे. आपण तर्कशुद्ध आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

हेही वाचा: इस्रायलमध्ये 'फ्लोरोना'चा पहिला रुग्ण; वाचा काय आहे प्रकरण?

पुढे त्यांनी म्हटलंय की, संपूर्ण जीनोमिक सिक्वेन्सिंगचे रिझल्ट्स असे दाखवतात की अद्यापही 70% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये डेल्टा प्रकार आहे. हा आकडा जिल्ह्यानुसार बदलेल. लसीकरण न केलेल्या व्यक्तींमध्ये सध्याच्या लाटेतही कोविड रोग गंभीर असल्याचे अभ्यास सांगतो. कृपया लक्षात ठेवा की, सध्याच्या लहरीमध्ये लसीकरण न झालेल्या व्यक्तींना मार्च ते मे 2021 च्या दुसऱ्या लाटेइतकाच धोका आहे. तिसऱ्या लाटेत कोविड संसर्गाची संख्या खूप मोठी असू शकते. जर 1% मृत्यूचे प्रमाण गृहीत धरलं आणि तिसऱ्या लाटेत 80 लाख कोविड प्रकरणे मानली तर 80,000 मृत्यू होऊ शकतात. त्यामुळे तिसरी कोविडची लाट ही सौम्य आहे आणि प्राणघातक नाही, अशी समजूत करुन घेऊ नका. ज्यांना लसीकरण केलेले नाही आणि ज्यांना कॉमोरबिडीटी आहे त्यांच्यासाठी हे तितकेच घातक आहे. त्यामुळे कृपया लसीकरणाचे कव्हरेज सुधारा आणि जीव वाचवा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Web Title: The Third Wave Will Not Be Mild Do Not Be Careless Serious Letter Of Health Secretary To District Collector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top