Asha Bhosle
sakal
आशा भोसले यांनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणे गायली. सर्व प्रकारची गाणी गाताना सर्व पिढ्यांवर त्यांच्या आवाजाची जादू कायम राहिली. काळानुसार स्वतःमध्ये बदल करीत, त्यांनी नेहमीच सादरीकरणांमध्ये वैविध्य आणले.
मरगळ झटकणारा, नवी उभारी देणारा, आपल्या दैनंदिनीत श्वासाइतकाच सहजतेनं एकरूप झालेला, सळसळत्या स्वरांचा खळाळता झरा असलेला, शतकातला प्रसन्न टवटवीत सूर म्हणजे आशा भोसले.