आशाजींनी मराठीसह अनेक भाषांत गायन केले. प्रचंड क्षमता आणि सातत्य. गाण्यांची संख्या १२ हजारांपेक्षा जास्त आणि त्या प्रत्येक भाषेचा अर्थ त्यांनी आपल्या गाण्यात अचूक पकडला.
काही अतिशय कर्तबगार, हरहुन्नरी, अष्टपैलू, दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे नाव घेतले, तर त्यात सर्वांत आधी नाव येते ते म्हणजे आशा भोसले. हे कर्तबगार हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अगदी तसेच.