राष्ट्रवादी आमदाराच्या कोविड सेंटरचं योगी सरकारला अप्रूप!

योगी सरकार
योगी सरकारE sakal

पारनेर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Ncp Mla Nilesh Lanke) यांनी उभारलेल्या कोविड सेंटरची चर्चा देशभरात सुरू आहे. भाळवणी येथे त्यांनी लोकसहभागातून मोफत कोविड सेंटर उभारलं आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath government) यांच्या सरकारलाही या कोविड सेंटरचे अप्रूप आहे.

आमदार लंके यांचे कौतुक त्यांच्या राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी आमदार लंके यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. लंके यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चाही करीत कोविडमधील कामाचे कौतुक केलं. (The Yogi Adityanath government also lauded Lankes Covid Center)

योगी सरकार
दुःख काळजात मावेना! आई गेली, कोरोनाने तीन कर्ती मुलेही नेली

आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी येथे कोरोना रूग्णावरील उपचारासाठी शरदचंद्रजी पवार (Sharadchandra pawar) आरोग्य मंदिर या नावाने १४ एप्रिलपासून एक हजार शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. या सेंटरची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. आता देश पातळीवरही त्याची दखल घेतली जाऊ लागली आहे.

या सेंटरची महती कानी आल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारमधील मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी आमदार लंके यांच्याशी संपर्क करून चर्चा केली. कोविड सेंटर कसे चालविले जाते, औषधोपचार, दैनंदिन उपक्रम, रूग्णांची देखभाल, डॉक्टर, परिचारिका व इतर मनुष्यबळ कसे उपलब्ध केले जाते. जेवणाची व्यवस्थेविषयीही त्यांनी जाणून घेतले. हे सेंटर चालविण्यासाठी लागणारी सारी यंत्रणा कशी उभी केली, याचीही माहिती घेतली. या वेळी लंके यांच्या रूग्णसेवेबद्दल तिवारी यांनी अभिनंदनही केले.

लंके यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून सुरू केलेले भाळवणी येथील कोविड सेंटर देशातील राज्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. जेवणही मोफत आहे. रूग्णांच्या मनोरंजनाबरोबरच येथे त्यांचा सकाळी योगाही करून घेतला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी लंके यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच अनेक मान्यवरांनी येथे भेटीही दिल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे शिष्टमंडळ येणार

तालुक्यातीलच नव्हे तर येथे येणारा प्रत्येक रूग्ण हा माझा आहे. असे समजून आम्ही चांगले उपचार करतो. येथे कोणताही खर्च लागत नाही. लोकसहभागातून व सहकार्यातून हे काम आम्ही सर्वजण करीत आहोत. त्याची माहिती घेण्यासाठी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांचा फोन आला होता. त्यांना माहिती दिली आहे. त्यांचे शिष्टमंडळसुद्धा कोविड सेंटर पाहाण्यासाठी पाठविणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

-नीलेश लंके, आमदार.

(The Yogi Adityanath government also lauded Lankes Covid Center)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com