Loksabha 2019: ...तर मोदींचे सरकार केवळ 13 दिवसांचे असेल- पवार

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं, तरी या सरकारची अवस्था वाजपेयींच्या 1996 च्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं 13 किंवा 15 दिवस टिकेल, असा दावा शरद पवारांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी असे सांगितले आहे.

मुंबई: मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं, तरी या सरकारची अवस्था वाजपेयींच्या 1996 च्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं 13 किंवा 15 दिवस टिकेल, असा दावा शरद पवारांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी असे सांगितले आहे.

पवार म्हणाले की, भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्याचं काम सुरु असून त्याला 21 मे रोजी मूर्त रुप येईल. इतकंच नाही, तर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी दुसरा नातू अर्थात रोहित पवार यांनाही विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवारांनी नातवांसह पहिल्यांदाच एकत्रित मुलाखत दिलेली पाहायला मिळाली आहे.

आमच्या घरात सगळे निवडणुकीत सहभागी होतात. रोहित शिक्षण, शेतकरी या प्रश्नाबाबत लक्ष देतात. आमच्या कुटुंबातील सगळे निवडणुकीत जबाबदारी समजून काम करतात. निवडणूक संपली की आपलं काम करतात. रोहित चांगली इंडस्ट्री चालवतो, शेतकऱ्यांशी त्याचा संपर्क आहे, अशा शब्दात पवारांनी नातवाचं कौतुक केलं. 

रोहित पवारांच्या उमेदवारीबाबत अजून पक्षाने विचार केला नाही, पक्ष निर्णय घेईल. मावळमध्ये लोकांनी पार्थचं नाव सुचवलं, म्हणून निर्णय झाला. लोक सांगतात रोहितला उमेदवारी द्या, तो लक्ष घालतो, कर्जत जामखेडमध्ये पण आमचा सतत पराभव झालेला आहे. तो मतदारसंघ जिंकायला राष्ट्रवादीला जो उपयुक्त उमेदवार वाटतो, तो उमेदवार देऊ, असेही पवार यावेळी म्हणाले.

Web Title: then Modis government will be only 13 days says sharad Pawar