...तर आम्ही उदयनराजेंना तिकीट देऊ : आठवले

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

''पाच राज्यांची विधानसभा निवडणूक म्हणजे 'प्रॅक्टिस मॅच' आहे. यात विरोधक जिंकले तरी लोकसभा निवडणुकीची 'फायनल मॅच' नरेंद्र मोदींची टीम जिंकेल''.

- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

पुणे : ''पाच राज्यांची विधानसभा निवडणूक म्हणजे 'प्रॅक्टिस मॅच' आहे. यात विरोधक जिंकले तरी लोकसभा निवडणुकीची 'फायनल मॅच' नरेंद्र मोदींची टीम जिंकेल'', असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज (शनिवार) व्यक्त केला. तसेच आरपीआय सातारा लोकसभेची जागा मागणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ, असेही ते म्हणाले.

पुण्याच्या मावळमध्ये आमदार बाळा भेगडेंनी आयोजित केलेल्या करिअर जत्रेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना हे दलितविरोधी नाहीत आणि भाजपही दलितविरोधी नाही. हे पक्ष जर दलितविरोधी झाले तर ते निवडून येऊच शकत नाहीत. आरपीआय सातारा लोकसभेची जागा मागणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ, असे रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, डावपेचात माहीर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या कुस्तीत राहुल गांधींना चितपट करतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Then we will give Udayan Raje ticket says Ramdas Athavale