

Maharashtra DJ Free City
ESakal
राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे डीजेचा वापर केला जात आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे. सोलापूरप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात 'डीजे फ्री सिटी' पॅटर्न लागू करण्याची आणि डीजेवर कडक बंदी घालण्याची मागणी विधान परिषदेत करण्यात आली. भाजपचे श्रीकांत भारतीय यांनी एका अल्पकालीन चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला. डीजे मुक्त सोलापूरसाठी दैनिक सकाळने केलेल्या जनजागृतीचा गौरवपूर्ण उल्लेख हिवाळी अधिवेशनात श्रीकांत भारतीय यांनी केला आहे. या बातमीची दखल सरकारने घेतली.