
Dhangar Reservation : धनगरांना आदिवासी आरक्षणामध्ये टाकण्याचा प्रश्नच नाही; मंत्र्यांचं विधान
मुंबई : धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी समाजाच्या ज्या योजना आहेत त्या लागू करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र धनगर समाजाला आदिवासी आरक्षणामध्ये टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. (Dhangar Reservation)
महाराष्ट्र शासन धनगरांना वेगळे आरक्षण देण्याचा विचारात असून आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याचा प्रश्न येतच नाही. तस काही सरकराच्या मनात ही नाही असं डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
धनगरांना आदिवासीसारखं स्वतंत्र आरक्षण देण्याचा शासनाचा विचार आहे. परंतु आदिवासी आरक्षणामध्ये त्यांना हिस्सा दिला जाणार नाही, अशी शासनाची भूमिका आहे. बहुतेक समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण मिळावे असे वाटत. परंतु कोणतेही सरकार असले तरी ते एका समाजाला दुसऱ्या समाजाचे आरक्षण देण्याचा विचार करणार नाही, असही गावित यांनी नमूद केलं.