

Ladki Bahin Yojana Installment
ESakal
महाराष्ट्रातील लाखो महिला सध्या एकच प्रश्न विचारत आहेत की, "लाडकी बहीण योजनेचा प्रलंबित हफ्ता कधी येणार?" नोव्हेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता डिसेंबर आणि जानेवारीच्या पेमेंटवर केंद्रित आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने ₹३,००० मिळण्याची चर्चा आहे, पण ही वास्तविकता आहे की फक्त निवडणुकीची चर्चा आहे? सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात अशा बातम्या वेगाने पसरत आहेत की डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित हप्ते १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातील.