रामदास आठवलेंच्या नावाचा पक्षच नाही! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) संस्थापक-अध्यक्ष मोहनलाल पाटील यांनी खासदार रामदास आठवले यांच्यासह या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. हा पक्ष आपण स्थापन केला असून यातील "ए' म्हणजे "आंबेडकरवादी' असा अर्थ अभिप्रेत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. 

संभाव्य तांत्रिक अडचणींमुळे आता पक्ष स्थापन करण्याऐवजी रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाशी ऐक्‍य साधण्याबाबत डॉ. राजेंद्र गवई यांच्याशी आठवले यांनी बोलणी सुरू केली आहेत. दुसरीकडे रिपब्लिकनचे (ए) बेकायदा अध्यक्ष म्हणून आठवले वावरत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. 

रामदास आठवले अध्यक्ष असल्याचे सांगणारा रिपब्लिकन (ए) हा पक्ष पाटील या आंबेडकरवादी कार्यकर्त्याने स्थापन केला होता. पक्षाच्या नावातील "ए' म्हणजे "आंबेडकरवादी' असा अर्थ होता. रिपब्लिकन पक्षांचे ऐक्‍याचे प्रयत्न फसल्यानंतर आठवले यांनी या पक्षात प्रवेश केला. आठवले यांचे राजकीय अस्तित्व मान्य करून पाटील यांनी त्यांना अध्यक्ष केले व स्वत: सरचिटणीस झाले. आठवले यांनी मात्र "ए' म्हणजे "आठवले' असा समज कार्यकर्त्यांमध्ये पसरवला. पाटील यांना पक्षात किंमत उरली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी सरचिटणीस म्हणून अधिकार वापरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका झालेल्या नाहीत. जिल्हा व राज्य अध्यक्षपदांच्या नियुक्‍त्याही झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक वर्षांपासून आठवले हेच बेकायदा अध्यक्ष म्हणून वावरत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. 

Web Title: There is no name for Ramdas athawale