LokSabha 2019 : नागपूर, सोलापूर मध्ये मोठ्या लढती होणार

Nana Patole and nitin gadkari
Nana Patole and nitin gadkari

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेस नाना पटोलेंना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरु होती. ती आता खरी ठरली. राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्यांमधील ही एक लढत असणार आहे. भाजप मधून काँग्रेस मध्ये आलेल्या नाना पटोलेंमुळे गडकरींना ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरातून उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामुळे सोलापूरातील सामना तिरंगी होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांमुळे सुशीलकुमार शिंदे यांना निवडूण आणण्यासाठी काँग्रेसला मोठी शिकस्त करावी लागणार असेच काहीचे चित्र आहे.
  
उत्तर मुंबई मधून निवडणूक लढणाऱ्या प्रिया दत्त यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. परंतु, राहुल गांधींनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून नसीम खानही उमेदवारीसाठी इच्छूक असल्याने तिकीट कोणाला मिळणार यामध्ये चुरस वाढली होती. शेवटी पक्षाने प्रिया दत्त यांना हिरवा कंदील दिला.मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून संधी देण्यात आली आहे. गडचिरोली मधून नामदेव उसेंडी काँग्रेसची धुरा सांभाळणार आहेत. 

यासोबतच धुळ्यातून रोहिदास पाटील, नांदेडमधून विद्यमान खासदार व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचे नाव पाठविण्यात आले आहे. तर हिंगोलीतून खासदार राजीव सातव पुन्हा लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले जाते. मात्र, विद्यमान खासदारांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाचा असल्याचे कळते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमधील उमेदवारीचा मुद्दा केंद्रीय निवडणूक समितीपुढे पाठविण्यात आला आहे. त्याचाही निर्णय पुढील काही दिवसांमध्ये घेतला जाईल. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com