Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरेंबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

टीम ई-सकाळ
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

आदित्य ठाकरे : युवासेनाप्रमुख पदापासून ते विधानसभा उमेदवारी 

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत येणारे नाव म्हणजे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात वाढल्याने आदित्य ठाकरे यांच्यावर लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले आहेत.

2010 मध्ये पहिल्यांदाच त्यांच्यावर पक्षाच्या युवक वर्गाची जबाबदारी देण्यात आली. शिवसेनेच्या युवासेना प्रमुखपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर ते राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय झाले. तरुण वर्गाला एकत्रित करण्याचे काम त्यांनी या जबाबदारीच्या माध्यमातून केले. 

Vidhan Sabha 2019 : राजापुरात आघाडीकडून स्थानिक नेतृत्त्व कि कुणबी नेता

पुस्तक प्रकाशन

राजकारणाशिवाय त्यांनी साहित्य क्षेत्रातही लेखण केले. त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत. 2007 मध्ये 'माय थॉट्स इन व्हाइट अँड ब्लॅक' असे त्यांचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. 

फुटबॉल असोसिएशन अध्यक्षपद

आदित्य ठाकरे यांच्याकडे क्रीडा क्षेत्रातील पदही देण्यात आले होते. 2017 मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. 

'नाईट लाईफ'चा मुद्दा केला होता उपस्थित

आदित्य ठाकरे यांनी राजकारणाच्या माध्यमातून विविध विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. मुंबईतील 'नाईट लाईफ'मधील मॉल्स् आणि रेस्टॉरंट्स रात्रभर सुरु राहावीत, यासाठी त्यांनी पुढाकार घेत हा विषय मार्गी लावला होता. 

गाणं गायन

आदित्य ठाकरे यांनी अनेक गाण्यांचे गायनही केले. त्यांच्या गाण्याचा 'उम्मीद' हा अल्बम लाँच केला. यामध्ये कैलाश खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन आणि सुनिधी चौहान यांच्यासह अनेक दिग्गज गायकांसोबत त्यांनी गायन केले. 

ऑक्टोबरला युवासेनाप्रमुख

आदित्य ठाकरे यांची 17 ऑक्टोबर 2010 मध्ये युवासेनाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. 2010 ते 2019 आजपर्यंत ते या पदावर कार्यरत आहेत.  

विधानसभा उमेदवारी

आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केली जात होती. त्यानंतर काल (सोमवार) आदित्य ठाकरे यांनी स्वत:हूनच आपली उमेदवारी जाहीर करत सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला. आता ते वरळीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

'आयएल अँड एफएस'ला सावरण्यासाठी उदय कोटक यांना मुदतवाढ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these few things of Aditya Thackeray do you know Maharashtra Vidhan Sabha 2019