उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 'या' दिग्गज व्यक्तींची उपस्थिती?

टीम-ई-सकाळ
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

 • शपथविधीची जय्यत तयारी
 • देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण

मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, अनेक दिग्गज व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राज्यभरातून एक लाख शिवसैनिक, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.

शपथविधी झाल्यानंतरही ठाकरे सरकारची होणार मोठी अडचण?

कोण कोण येणार?

 1. सोनिया गांधी (कॉंग्रेस अध्यक्षा)
 2. कॅप्टन अमरजितसिंग (मुख्यमंत्री, पंजाब)
 3. ममता बॅनर्जी (मुख्यमंत्री, प. बंगाल)
 4. नितीशकुमार (मुख्यमंत्री, बिहार)
 5. अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)
 6. अशोक गेहलोत (मुख्यमंत्री, राजस्थान)
 7. कमलनाथ (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)
 8. भूपेश बघेल (मुख्यमंत्री, छत्तीसगड) 
 9. अहमद पटेल (कॉंग्रेस नेते)
 10. मल्लिकार्जून खर्गे (कॉंग्रेस नेते)
 11. सी. वेणूगोपाल (कॉंग्रेस नेते)
 12. अखिलेश यादव (उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री )
 13. तेजस्वी यादव (बिहारचे माजी उपमुख्यमंत्री)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these persons may present Uddhav Thackerays swearing ceremony