शपथविधी झाल्यानंतरही ठाकरे सरकारची होणार मोठी अडचण?

टीम-ई-सकाळ
Wednesday, 27 November 2019

उद्या (ता. २८) शिवतीर्थावर त्यांच्यासोबत ९ मंत्र्याचा शपथविधी होणार असला तरी त्यांची मोठी अडचण होणार असल्याचे दिसत आहे.

मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या (ता. २८) शिवतीर्थावर त्यांच्यासोबत ९ मंत्र्याचा शपथविधी होणार असला तरी त्यांची मोठी अडचण होणार असल्याचे दिसत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शपथविधी झाल्यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारला सात दिवसांचा अवधी दिला आहे. भारतीय जनता पक्षाकडून या सात दिवसांच्या काळात बहुमत ठराव हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या काही नाराज नेत्यांना हाताशी धरून भाजपकडून हा प्रयत्न केला जाणार आहे. आमदारांनी ठाकरे सरकारच्या विरोधात मतदान करावे म्हणून भाजप प्रयत्न करत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. याबाबतची चर्चा आता सोशल मिडीयावरही चालू झाली आहे.

भारतात भ्रष्टाचारात घट; तरीही भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत...

ठाकरे सरकारसमोरील अडचणी संपल्या नाहीत, असेच यावरून सध्यातरी दिसत आहे. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे प्रयत्न केले जाणार असून बहुमत सिद्ध करतेवेळी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची ताकद पणाला लागणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी १४४ आमदारांची गरज असून सध्या महाराष्ट्र विकास आघाडीला एकूण १६२ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, यातील काही आमदारांनी विरोधात मतदान केले तर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोसळू शकते.

राष्ट्रवादीचं ठरलं ! अजित पवारांना 'या' गोष्टीचे सर्वाधिकार

दरम्यान, भाजपचे अल्पमतातील सरकार कोसळल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित झाले असून उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे निश्चित आहे. यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांनी आज होणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीलाही उपस्थिती लावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray Government may a in problem after taking oath