साडेतीन हजार शिक्षकांना काम नाही, पण पगार सुरू

Thirty five thousand teachers do not work but the salary continues
Thirty five thousand teachers do not work but the salary continues

सोलापूर : सरकारच्या आदेशानंतरही राज्यातील अतिरिक्‍त शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी अनुदानित शाळांमध्ये रुजू करून घेतले जात नाही, त्यामुळे सध्या साडेतीन हजार शिक्षक काम नसताना पगार घेत आहेत. 

राज्यात सध्या शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण झालेले सुमारे 75 हजार भावी शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे पटसंख्येअभावी अतिरिक्‍त शिक्षकांची संख्या वाढतच आहे. अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्‍त शिक्षकांचा प्रश्‍न निर्माण झालेला असतानाही दुसरीकडे नव्याने शिक्षक भरती केली जात असल्याचे दिसून येते. शाळांतील मुलांची पटसंख्या व उपस्थितीची माहिती येत्या 15 सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करावी लागणार आहे. 11 सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर ऑक्‍टोबरपर्यंत शाळांचा आकृतिबंध निश्‍चित केला जाणार आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाची स्थिती 
- पवित्र पोर्टलवरूनच ऑनलाइन पद्धतीने यापुढे शिक्षक भरती 
- 2008 नंतरच्या 915 शाळांना मिळणार वेतनेतर अनुदान 
- 596 अर्धवेळ ग्रंथपालांना लवकरच पूर्णवेळ केले जाणार 
- 123 शाळा व 123 तुकड्यांची माहिती अर्थ विभागाने मागविली 
- माहिती वेळेत न दिल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित 

राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढत आहे. शिक्षक अतिरिक्‍त होण्याचे प्रमाण कमी करण्याकरिता मराठी माध्यमाच्या शाळांना गुणवत्ता वाढवावी लागेल. तुकड्यांतील पटसंख्येवरून नव्हे, तर शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येवरून शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अतिरिक्‍त शिक्षकांचे समायोजन न करणाऱ्या शाळा, मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल. 
- गंगाधर म्हमाणे, शिक्षण संचालक 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com