देशात ६ महिन्यांत तीस हजार टन वैद्यकीय कचरा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

कोरोना काळात वापरण्यात आलेले मास्क, पीपीई कीट, इंजेक्शन अन्य औषधे याद्वारे गेल्या सहा महिन्यात देशभरात तब्बल तीस हजार टन ‘कोविड-१९’ जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे.

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक निर्मिती
पुणे - कोरोना काळात वापरण्यात आलेले मास्क, पीपीई कीट, इंजेक्शन अन्य औषधे याद्वारे गेल्या सहा महिन्यात देशभरात तब्बल तीस हजार टन ‘कोविड-१९’ जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक ‘कोविड-१९’ जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणारे राज्य आहे. देशातील रुग्णालये, आरोग्य सेवा, विलगीकरण केंद्रे, कोविड सेंटर, चाचणी प्रयोगशाळा अशा विविध ठिकाणी तयार होणाऱ्या कचऱ्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यान्वित केलेल्या ‘कोविड१९बीडब्ल्यूएम’ ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे उघड झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुलै २०२०मध्ये ‘कोविड-१९’ जैव वैद्यकीय कचऱ्यासंदर्भात मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार देशभरातील कोविड-१९ संदर्भातील जैव वैद्यकीय कचऱ्याची माहिती ‘कोविड१९बीडब्ल्यूएम’ ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे संकलित करण्यात येत आहे. जुलै ते डिसेंबर महिन्यातील अहवाल मंडळाने नुकताच जाहीर केला आहे. यानुसार सर्वाधिक जास्त ‘कोविड-१९’ जैव वैद्यकीय कचरा हा ऑक्टोबर-२०२० मध्ये निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. देशात गेल्या सहा महिन्यात २९ हजार ९७० टन इतका, तर राज्यात ४८ हजार ८४४ टन इतका कोविड-१९ जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाली आहे. 

पुण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग; मशिनरी जळून खाक

ऑगस्टमध्ये सर्वाधिक कचरा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, जुलै-डिसेंबर २०२० दरम्यान राज्यातून चार हजार ८४४ टनांहून अधिक जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाली आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त कचरा हा ऑगस्टमध्ये (१,३५९टन) निर्माण झाला. या जैव वैद्यकीय कचऱ्यावर विविध पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

Fire at Serum Institute : एक हजार कोटींचे नुकसान : आदर पूनावाला

सध्या जैव वैद्यकीय कचरा आणि ‘कोविड १९’ जैव 
वैद्यकीय कचरा अशा दोन प्रकारात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. कोरोनावर उपचार होणाऱ्या रूग्णालयातील विलिगीकरण केंद्र, कोविड सेंटर, प्रयोगशाळा अशा ठिकाणांहून ‘कोविड १९’ जैव वैद्यकीय कचरा संकलित केला जात आहे. कोरोनामुळे उत्पन्न होणाऱ्या या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘लॅंडफिल, इनसिनीरेशन (जाळणे), पुनर्निर्मिती अशा पद्धती वापरण्यात येत आहेत. यासाठी सीपीसीबीच्या जैव वैद्यकीय कचऱ्याशी संबंधित मार्गदर्शन सूचना पाळण्यात येत आहेत.
- नितीन शिंदे, प्रादेशिक अधिकारी-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty thousand tons of medical waste in 6 months in the country