cm eknath shinde on uddhav thackeray
cm eknath shinde on uddhav thackerayesakal

Uddhav Thackeray: "हा निकाल अंतिम नाही"; उद्धव ठाकरेंनी दिले पुढच्या कार्यवाहीचे संकेत

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला.
Published on

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. या निकालावर उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निकाल अंतिम नाही, अशा शब्दांत त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे संकेत दिले. तसेच नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याचंही ठाकरेंनी म्हटलं आहे. (This verdict is not final Uddhav Thackeray gave an indication of the next course of action on ShivSena MLA disqualification result)

cm eknath shinde on uddhav thackeray
Sharad Pawar on ShivSena: "निकालाबाबत सत्ताधाऱ्यांनी आधीच भाष्य केलं होतं, त्यामुळं.." शरद पवारांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीनं लवाद म्हणून नार्वेकरांना बसवलं होतं त्यावरुन त्यांच्या वागणुकीतून हे स्पष्टपणे दिसत होतं की, यांची मिलीभगत आहे. आजच्या निकालामुळं एक गोष्ट प्रश्नांकित झालेली आहे की पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावं आणि त्याचा राजमार्ग कसा असेल हे त्यांनी सांगितलं.

cm eknath shinde on uddhav thackeray
Aditya Thackeray: सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा पण...; आमदार अपात्रतेचा निकाल विरोधात गेल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आजपर्यंत आपण असं मानत आलो की, भारताच्या घटनेनुसार सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे सुप्रीम असतात. पण नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला त्यातून त्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवले आहेत. आमच्या मागं महाशक्ती आहे आम्ही सुप्रीम कोर्टाला सुद्धा जुमानत नाही हे त्यांच्या निकालातून दिसून आलेलं आहे.

cm eknath shinde on uddhav thackeray
Shiv Sena MLA Disqualification Result: शिंदेंची सेना जिंकली! 16 बंडखोर आमदार ठरले पात्र; मुख्यमंत्रीपदही वाचलं

मूळ केस अपात्रतेची होती पण त्यांनी अपात्र कोणालाच ठरवलेलं नाही. मग शिवसेनेची घटना तुम्ही ग्राह्य धऱत नसाल तर मग आम्हाला अपात्र का केलं नाही? असा सवालही त्यांनी केला. त्याही पलिकडे जाऊन शिवसेना कोणाची यावर त्यांनी निकाल दिला. जो निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे, ज्याला सुप्रीम कोर्टात आम्ही आव्हान दिलं आहे, तोच त्यांनी पाया मानला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान करत नार्वेकरांनी प्रिव्हिलेजचा गैरफायदा घेतला आहे. जर ही याचिका दाखल करता येणार नसेल तर सुप्रीम कोर्ट याबाबत सुओमोटो दाखल करुन घेते का? हे पहावं लागेल, असंही ते म्हणाले.

cm eknath shinde on uddhav thackeray
Ram Mandir: मोदींच्या व्हिसासाठी अमेरिकेसोबत लढणाऱ्या डॉक्टरला मिळालं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण; कोण आहे ही खास व्यक्ती? जाणून घ्या

2018 ला माझी नियुक्ती सुप्रीम कोर्टानं मानली आहे. त्यामुळं मला अधिकारच नसल्याचं सांगण्याचा नार्वेकरांनाच अधिकार नाही. कोर्टानं आमचा व्हिप, गटनेता मानला होता. २०१८ सालची आमची घटना यांना मान्य नाही तर मग हे कशाच्या आधारे निवडून आले होते. त्यांना सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं होतं ते सोडून नको त्यात घुसून त्यांनी वेळकाढूपणा केला. हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते. आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत. कोर्टाला विनंती आहे की निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे. कारण यांना निवडणूक काढायची आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com