
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या खातेवाटपात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडीत करीत महसूल खाते मिळविण्यात यश मिळवले आहे. चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खात्यावर समाधान मानावे लागले आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या खातेवाटपात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडीत करीत महसूल खाते मिळविण्यात यश मिळवले आहे. चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खात्यावर समाधान मानावे लागले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
खातेवाटपामध्ये काँग्रेसमध्ये महसूल खात्यासाठी सर्वाधिक चुरस होती. यापूर्वी महसूल मंत्री राहिलेले आणि सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले बाळासाहेब थोरात यांना कोणत्याही परिस्थितीत महसूल खाते आपल्याकडेच ठेवायचे होते. तर अशोक चव्हाण यांनाही ते हवे होते. मात्र अखेर हा वाद मिटून थोरात यांनी बाजी मारली आहे. ऊर्जा खात्यासाठीही नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यात चुरस होती. अखेर राऊत यांनी ऊर्जा खाते पटकावले. तर वडेट्टीवार यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या ओबीसी खात्यावर समाधान मानावे लागले आहे.
अखेर 'त्या' शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
पहिल्या महिला शिक्षण मंत्री
महिला व बालकल्याण हे खाते यशोमती ठाकूर यांना, तर शालेय शिक्षण हे महत्त्वाचे खाते वर्षा गायकवाड यांना मिळाले आहे. गायकवाड या राज्याच्या पहिल्या महिला शालेय शिक्षण मंत्री ठरल्या आहेत.