मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

मंत्रालयात घुसून ठार मारू

- सुरक्षेत वाढ 

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांना हे पत्र नांदेडच्या एका तरुणाने पाठवले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

मंत्रालयाच्या गृह विभाग कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे 5 ऑक्टोबरला एक गोपनीय पत्र आले होते. 'मंत्रालयामध्ये घुसून मारू' असे म्हणत जीवे मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली.  हे पत्र संतोष कदम या व्यक्तीने लिहिले आहे. संतोष कदम या तरूणाने दिलेल्या पत्रात आपला फोन नंबरही नमूद केला आहे. 

दरम्यान, संतोष एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे. 

मंत्रालयात घुसून ठार मारून

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) भीती दाखवून इतर आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणले जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षातील कार्यकर्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भाजपचा झेंडा हातात दिल्यास आणि ईडीची भीती दाखविल्यास मंत्रालयात घुसून ठार मारू, असे या पत्रात लिहिण्यात आले आहे. 

सुरक्षेत वाढ 

मुख्यमंत्र्यांच्या नावे अशाप्रकारे धमकीचे पत्र आल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threat to kill CM Devendra Fadnavis