पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात सोमवारी पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के बसताच लोक घरेदारे सोडून रस्त्यावर आले. पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत असून भूकंप प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.