पेणमध्ये तीन कुटुंबे वाळीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

पेण : जमिनीच्या वादातून 2014 मध्ये वाळीत टाकलेल्या कुटुंबासोबत संबंध ठेवल्याच्या रागातून संजय श्रीपत पवार आणि त्यांच्या दोन भावांना वाळीत टाकल्याची घटना पेण तालुक्‍यातील मायनी गावात घडली आहे. या प्रकरणी गावातील 13 जणांविरोधात पेण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

मायनी गावात जमिनीच्या वादातून गावांतील रघुनाथ पवार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना 2014 पासून वाळीत टाकले आहे. या कुटुंबासोबत सामाजिक, आर्थिक संबंध ठेवण्यावरून संजय श्रीपत पवार (वय 48) आणि त्यांचे भाऊ राजाराम पवार, गोविंद पवार यांच्या कुटुंबांना ग्रामस्थांनी वाळीत टाकले. याबाबत संजय पवार यांनी पेण पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून सामाजिक बहिष्कृत प्रकरण 2016 अन्वये 13 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे पेण पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले. 

Web Title: Three families in excommunication

टॅग्स