ओमान देशात तिघे समुद्रात बुडाले

जतमधील म्हमाणे कुटुंबातील व्यक्तींचा समावेश
three including father and two children were drowned in sea of oman
three including father and two children were drowned in sea of omansakal

जत : शहरातील सुपरिचित वकील राजकुमार म्हमाणे यांचे मोठे बंधू व त्यांची दोन मुलं ओमान देशातील एका समुद्रकिनारी फिरायला गेले असता लाटेत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शशिकांत ऊर्फ विजयकुमार म्हमाणे, त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस अशी समुद्रात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. रविवारी ही घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता तर बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे.शशिकांत म्हमाणे हे दुबई येथील इंटरनॅशनल कंपनीमध्ये अभियंता आहेत. याठिकाणी शशिकांत त्यांची पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) हे सर्व राहण्यास आहेत.

रविवारी ईदची सुट्टी मिळाल्याने म्हमाणे कुटुंबासह इतर मित्र मंडळी ओमान देशात फॅमिलीसह फिरायला गेले होते. दरम्यान, येथील एका समुद्रकिनारी लाटांचा आनंद घेत असताना मागून जोराची लाट आल्यानंतर यामध्ये नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस हा वाहून जात असताना शशिकांत हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले असताना ते ही समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी तेथील स्थानिक पथकामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे वृत सांगण्यात आले आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा कुटुंबाकडून करण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com