लुटीच्या तयारीतील तिघांना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

लोणी - लोणी ते गोगलगाव रस्त्यावरील जनावरांच्या बाजारतळाजवळ लुटीच्या तयारीत असलेल्या तीन संशयितांना पोलिसांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले. महेश भाऊसाहेब भागवत (वय 28), सचिन भाऊसाहेब ढोबळे (वय 30) व सागर रावसाहेब राक्षे (वय 23, सर्व रा. लोणी खुर्द) अशी आरोपींची नावे आहेत. राहाता न्यायालयाने आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अनिल गवांदे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. गोगलगाव रस्त्यावर मध्यरात्री गस्त घालताना पोलिसांना पाच तरुण दबा धरून बसल्याचे दिसले. संशय आल्याने चौकशी केली असता, त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस, तसेच मिरची पूड व चाकू आढळून आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन दोघे पसार झाले. 

Web Title: Three robbers arrested